राजमाची

राजमाची श्रेणी(difficulty) : मध्यम

किल्ल्याची ऊंची :3600

नमस्कार मित्रहो… मध्ये बराच काळ लोटून गेला जरा interview, गणपती बाप्पाची तयारी ह्यात busy झालो होतो. आत्ता वेळ मिळाला म्हटला आपलं Trekking चे अनुभव लिहूया,चला तर मग राजमाची बद्दल जाणून घेऊया. राजमाचीला सुद्धा २ दिवस हवेत जर तुम्हाला एकदम व्यवस्थित किल्ला बघायचा असेल.राजगडा सारखाच आमचं,राजमाचीचं देखील हो नाही हो नाही होत होतं. अगदी जायच्या आधल्या दिवशी पर्यंत फक्त आम्ही म्हणजेच मी,राहुल, कृष्णा, विराज तयार होतो, बाकीच्यांचे नेहमीची नाटकं होती. हो नाही हो नाही करत आम्ही ६ जण निघालो. राजमाची ला जाण्याचं रस्ता एकदम अप्रतिम आहे, रस्त्या बद्दल खूप मोठा किस्सा आहे तो नंतर, इतका जबरदस्त आहे तो किस्सा नंतर कळेलच तुम्हाला. सकाळी ८ ला आम्ही घाटकोपरवरून निघालो,Express Highway पकडला आणि लोणावळाच्या दिशेने गेलो. सुमारे 2 तासानंतर आम्ही राजमाचीच्या पायथ्याशी पोहोचलो. पायथा म्हणजे एका point पर्यंत ज्यापुढे गाडी जाऊ शकत नाही तेथे गाडी park करून चालायला सुरवात केली. सुमारे सकाळचे १०.३० च्या आस-पास आम्ही वारी सुरु केली, उन भरपूर पडलं होतं परंतु झाडं इतकी गर्द होती की उन्हाचा त्रास इतका जाणवला नाही. मध्येच पावसाच्या सारी येत होत्या त्यामुळे आमची वारी मस्त रमत गमत चालली होती. ३ तासांनी आम्ही राजमाची गावात पोहोचलो, आम्ही तेथे आधी पासूनच सरपंचांच्या घरी नाश्ता-जेवणाची सोय करून ठेवली होती. चहा-नाश्ता थोडा आराम केला, किल्ल्या बद्दल विचारपूस केली आणि आम्ही किल्ला बघण्यास निघालो. अत्ता एक गम्मत घडली, कळेलच हळू हळू राजमाची वर २ बालेकिल्ले आहेत जणू काही २ वेगळे-वेगळे किल्लेच आहेत, मनरंजन आणि श्रीवर्धन बालेकिल्ला. आम्ही जेथे आमची सोय केली होती तेथून मनरंजन बालेकिल्ला अगदी जवळ होता. आम्ही विचार केला आज फक्त मनरंजन बघूया आणि उद्या सकाळी लवकर उठून श्रीवर्धन बघून परतीचा मार्ग धरू . आम्ही निघालो अगदी समोरच हाकेच्या अंतरावर होता मनरंजन बालेकिल्ला, तेथे एक दिशा दाखवणारी पाटी लावली होती त्या प्रमाणे आम्ही गेलो सरळ. बालेकिल्ल्याला महादरवाजा असतो हे आम्हाला इतके TREK करून माहीत होतं, आम्ही त्याच्या शोधात चालतच राहिलो. चालता चालता लक्षात आलं मनरंजन किल्ला मागे जात आहे आणि आपण श्रीवर्धन किल्ल्या जवळ जात आहोत, आम्हाला वाटलं दोन्ही बालेकिल्ल्या मधून वाट असेल, पण नाही चालत चालत श्रीवर्धन किल्ला सुद्धा मागे सरू लागला साला म्हटला आम्ही पाटी तर बरोबर वाचली होती आणि रस्ता पण बरोबर धरला होता मग आम्ही रस्ता कसा चुकलो ??? सूर्य मावळतीला येण्यासाठी काही तासच उरले होते, प्रचंड भूक लागली होती, म्हटला चला बसू इथेच झाडाखाली न्याहारी करून घेऊ मग रस्ता शोधू . तुम्हाला सांगतो इतकी भूक लागली होती बका-बका आम्ही आमचे डब्बे संपवले, जेव्हा तुम्हाला खरोखर भूक लागलेली असते तेव्हा साधं Parle-G च biscuit देखील गोड लागतं. न्यहारी नंतर पुन्हा वारी सुरु केली रस्ता काही संपतच न्हवता काही कळेना, अत्ता काय करायचा असा प्रश्न पडला तर अचानक आम्हाला एक गावकरी भेटला, आम्हाला हायसे वाटले वाटलं चला अत्ता आपण बरोबर मार्गावर जाऊ शकतो. त्या गावकर्याला आम्ही विचारलं “आम्हाला मनरंजन बालेकिल्ल्याला जायचा आहे रस्ता कुठून आहे सांगा आम्हाला” तो म्हणाला “आव तुम्ही लई पुढे आलं की बघा, असा करा मी तुम्हाला एक SHORTCUT दाखवतो तुम्ही तिथून सरळ जावा.” आम्ही त्याच्या पाठी-पाठी गेलो त्याने आम्हाला एक पाऊलवाट दाखवली आणि म्हणाला इथून वाट पकडून जावा. आम्ही ती वाट पकडली खरी पण जसं-जसं आम्ही पुढे जाऊ लागलो तस-तसं वाट छोटी होऊ लागली, झाडं घनदाट होऊ लागली. Saurabh trek lead करत होता, म्हणजे तो नेहमी पुढेच चालत असतो आणि मी सर्वात शेवटी असतो कारण कोणी थकलं की त्याला बरोबर घेऊन जातो. Saurabh अचानक थांबला आणि सगळेच थांबले मी मागून येतच होतो, तितक्यात Rahul बोल्ला मला तू पुढे वाट बघून ये बरोबर वाटली तर जाऊ पुढे नाहीतर आपण परत मागे फिरुया कारण अंधार पडू लागला होता आणि आमच्या कडे फक्त २ लहान torch होत्या. मी पुढे जाऊन वाट बघू लागलो, पुढे जाऊन वाट अगदी गायबच होत होती, मी म्हटला नको चला परत वाट काळातच नाही आहे, आणि जर मला वाट कळत नसेल तर तेथे कोणी जात नाही, कारण मला त्यांच्यापेक्षा थोडं जास्त समजतं कोणती पाऊलवाट आहे आणि कोणती भूलवाट. गावकर्यांचा shortcut आम्हाला महागात पडला असता 😛 जर आम्ही ती वाट पकडून पुढे गेलो असतो तर. असं करत आम्ही सरपंचाच्या घरी परत आलो इतकं चाललो होतो आम्ही जणू काही किल्ल्याला प्रदक्षिणा घातली आम्ही. सरपंचाच्या घरी आम्हाला एक दुसरा trekking group भेटला, आम्ही त्यांना विचारलं तुम्ही मनरंजन किल्ल्यावर जाऊन आले का ? ते म्हटले आम्ही अत्ता जात आहोत, ते सुद्धा त्याच दिशेला निघाले आणि बघतो तर चक्क ५ मिनटात ती मंडळी किल्ल्यावर पोहोचली. आम्ही ते बघून डोक्यावर हात ठेवला आणि मराठी म्हण आठवली “काखेत कळसा गावभर वळसा”.अत्ता तुम्हाला गम्मत कळली असेल, जी मी मगाशी बोललो होतो, अजून रस्त्याची गम्मत बाकी आहे.

सूर्य मावळतीला येतच होता, मी म्हटला चला आपण पण पटकन वरती जाऊन येऊ, कोणी यायला तयार न्हावतं सगळी मंडळी चालून दमली होती, बरोबरच आहे म्हणा किल्ल्याला प्रदिक्षणा घालणं कोण येरा-गबार्याच काम न्हावे. मी तसा दम्लोच होतो पण वरती किल्ल्यावर जाण्याची उत्ख्सुख्ता फार होती मला. मनात विचार आला आपण काय रोज-रोज राजमाचीला येणार नाही मग आपण किल्ल्यावर जायला हवं, असं मी Chaitanya ला पण बोल्लो, माझा विचार ऐकून तो तयार झाला, आम्ही दोघं पूर्ण जोशात किल्ल्याकडे कूस केली, अगदी ३-४ मिनटात आम्ही वरती पोहोचलो, किल्ल्याची तटबंधी अप्रतिम होती, आमचे भाग्य इतके सुंदर होते की आम्हाला मावळता सूर्य बघायला मिळाला, तसा आपण रोजच बघतो पण इतकं उंचा वरून सूर्य इतकं सुंदर दिसतो जणू त्याच्या कडे बघतच राहावे. मग काय आपला नेहमीचं मावळत्या सूर्याचे फोटो काढू लागलो, इतका मंद वारा सुटला होता, तिथेच बसून राहावे वाटत होतं. कातरवेळ एकदम सुंदर असते ती आपल्यला आठवणीत बुडवून टाकते. असो मी आणि चैतन्य मस्त किल्ला बघून आलो, बाकी जण बसली पत्ते कुटत. ह्यावेळी प्रथमच आम्ही विचार केला NIGHT TREK करूया, ऐकायला मस्त वाटत होते पण कुठे तरी मनात थोडी भीती होती, पण म्हटला चला बिनधास्त. आम्ही आमचं रात्रीचं जेवण जेवलो आणि NIGHT TREK साठी निघालो, तसं मी आणि शिंत्रेने आधीच विचार करून रस्ता बघून ठेवला होता, आम्ही जेव्हा मनरंजन उतरून खाली आलो तेव्हा सगळ्यांना night trek बद्दल विचारलं, सगळे तयार झाले होते मग काय जेवलो आणि torch घेऊन निघालो, शिंत्रे आणि मला रस्ता माहीत होता मग ह्यावेळी शिंत्रे lead करत होता, आणि मी नेहमी प्रमाणे मागूनच येत होतो, आमच्या बरोबर आमचे Driver देखील होते त्यांची तर ट्रेकचीच पहिलीवेळ आणि त्यात night ट्रेक, त्यांची काय अवस्था झाली असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता, आमचीच पहिली वेळ night trek त्यात त्यांची तर ट्रेकचीच पहिली. हळू हळू आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ल्यावर पोहोचलो, कसला उठ्कांथावार्धक अनुभव होता night trek चा, प्रचंड काळोख जणू काही काळोख आम्हाला खायला उठला असं वाटत होतं, तेथे गुंफा होत्या. आम्ही आमचे bags ठेवले आणि थोडा वेळ आराम केला. 

आता रात्र आली म्हणजे शेकोटी तर केलीच पाहिजे, पावसाचे दिवस होते, त्यामुळे सगळी ओळीच लाकडं होती, आजुबाजूचा परिसर बघितला, गुंफा बघितली आणि लाकडं गोळा केली. आता पाऊस असल्याने आग पेट घेत नाही लवकर. Saurabh साहेबांनी पेट्रोल आणलं होतं, खराब झालेले होतं ते. विराज आग पेटवतच होता, छोट्या लाकडाने पेट घेतला होता, मी असाच काही विचार न करत petrol ची bottle उघडली आणि petrol उतू लागलो, बघता बघता आज वर bottle पर्यंत आली मी बोलत होतो विराज बरोबर, bottle कडे लक्ष न्हवता, विराज ने बघितलं आणि तो ओरडला मी पटकन ती bottle फेकली, विराज ती bottle वीजवण्यासाठी पायाने bottle उडवू लागला तर त्याच्या पायातील बूट जळला. ५ मिनिटे सगळे गप्पा बसले आणि अचानक सगळे हसू लागले, आरे म्हणजे इतका मूर्खपणा आम्ही कधीच केला नाही, बारा असं पण न्हावतं की मी प्रथमच शेकोटी करत होतो. आम्हाला तेव्हा Thums Up ची advertise आठवली “AAJ KUCH TOOFANI KARTE HAIN”. शेवटी मी शेकोटी पेटवली आणि आम्ही झोपी गेलो, रात्री इतका प्रचंड पाऊस पडला थंडी ने काप्र भरलं होतं अंगात. मी आणि शिंत्रे सकाळी ५.१५ ला उठलो, आमची बाकीची मंडळी झोपलेलीच, इतका धुकं पडलं होतं की हात समोर केले तर हाताची बोटे दिसत न्हवती. मधेच वार्याची झुळूक यायची आणि सगळं धुकं गायब, आम्ही जणू ढगातच आहोत असं वाटत होतं. इतकं सुंदर आणि स्वछ वातावरण आपल्याला मुंबईच्या जीवनात काही अनुभवता येत नाही, आम्ही जेव्हा केव्हा ट्रेक ला जातो तेव्हा नेहमी बोलतो चला OXYGEN भरून घेऊन जाऊया, मुंबई तर आपल्याला दुषित हवाच मिळते. कोंकण इतकं सुंदर आहे उगीच नाही त्याला WORLD HERITAGE SITE म्हणून संबोधले जाते. मी आणि शिंत्रे ने सगळ्यांना उठवले, फ्रेश झालो आणि गडावरची वाटचाल पुन्हा सुरु केली. 
श्रीवर्धन किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानकावर जायचा होतं, तेथे आम्ही पोहोचलो. अतिशय सुंदर निसर्ग होता, शब्द कमी पडतील जर वर्णन करू लागलो तर.
असो एक साधारण २ तासात आम्ही श्रीवर्धन किल्ला बघितला आणि परतीचा मार्ग धरला. सरपंचाच्या घरी आलो, गरमा-गरम कांदेपोहे आणि चहा घेतला, मला माहित आहे तुमच्या तोंडी पाणी सुटला असेल कारण सकाळच्या थंडीत कांदेपोहे आणि चहा म्हणजे सोने पे सुहागा. परतीला निघताना नेहमी वाटते काश आपण शिवरायांच्या काळात असतो तर… शिवाजी महाराजांना आम्ही भेटू शकलो असतो. 
असो सुमारे दोन-अडीच तासात आम्ही त्या पोइंत पर्यंत खाली आलो. रात्रभर पाऊस नुसता कोसळतच होता, त्यामुळे रस्ता अगदी चिखलमय झाला होता, अगदी दोन्ही पाय आत जाऊन अडकतील इतकं चिखल झाला होता. 
अत्ता ती गम्मत जी मी सुरवातीला बोललो होतोना रस्त्याबद्दलची ती इथे घडली. आम्हाला ठाऊक होतं पाऊस जोरात जर पडलं तर रस्त्याची बेकार हलत होणार होती. तसं सर्पांचाच्या मुलाने आम्हाला राजमाचीला येण्या अगोदरच सांगितला होतं गाडी बाहेरच लावा म्हणून, पण १९ kms लांब गाडी पार्क करून ट्रेक करींच म्हणजे आम्ही अर्ध्या रस्त्यातच परत आलो असतो. १९ kms चालणं काही खाऊच काम नाही, नुसता ते १९ kms नाही पुढे गड चढायाच्या होता म्हटला चला जाऊ काय होईल ते नंतर बघू म्हणून आम्ही गाडी घेऊन आलो होतो खरी त्या पोइंत पर्यंत. अत्ता आम्ही गाडीत बसलो आणि परतीला निघालो, अगदी हळूच जात होतो, पाऊस नुसता कोसळत होता, एक पोइंत आला जेथे आम्हाला माहित होता गाडी इथे फसली की आपली वाट लागणार आणि तसाच झालं आमची sumo त्या चिखलात फसली. Driver काकांनी खूप प्रयत्न  केला गाडी काही हालेना. आम्ही चिखलात दगडी टाकली आणि पुन्हा प्रयत्न केला. तरी सुद्धा गाडी काय पुढे जाईना. धक्का मारला पण ती sumo काही पुढे जातच न्हवती जणू काही हट्टाच धरून बसली होती. इतक्यात तेथे dirt driving वाले आले, त्यांनी सुद्धा सुमो चालवून बघितली, तो dirt driver कसला चालवत होता, आम्ही बघूनच चाट पडलो, जणू काही सुमो उडवत आहे असं वाटत होता. पण त्याच्याने सुद्धा काही जमलं नाही, ते म्हणाले आम्ही परत जाताना तुमच्या गाडीला दोरी बांधून घेऊन जाऊ . आम्ही इतके घाबरलो होतो, मनात एकाच विचार होता आता आपली sumo इथून बाहेर जाणार कशी?? किती प्रयत्न केले तरी सुमो त्या चिखलातून जातच न्हवती. १ तासा नंतर अजून एक dirt driving वाले आले. त्यांनी सुद्धा प्रयत्न केला त्यांना पण काही जमेना, आम्हाला अजून भीती वाटू लागली आता आपली sumo  इथून बाहेर जात नाही. शेवटी त्यांनी आमच्या सुमोला दोरी बांधली आणि त्यांची गाडी सुरु केली, पहिले ती गाडी काय हलतच न्हवती, आम्ही मागून धक्का मारतच होतो, त्या गाडीचा जोर वाढला आणि आम्ही sumo बाहेर निघाली. इतकं आनंद झाला आम्हाला त्या क्षणी आम्ही जोरा-जोरात ओरडत होतो, नाचत होतो, तर अशी ही गम्मत रस्त्याची.
पुढे आम्ही बाहेर पडलो आणि एक्ष्प्रेस्स वय पकडून घरी आलो.
आता जरा राजमाचीचा इतिहास बघूया थोडक्यात…
कल्याण – नालासोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोरघाट हा पुण्याकडे जाणारा हा पुरातन व्यापारी मार्ग होता. या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसूलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणार्‍या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे. यापैकी सर्वात प्रमुख किल्ला म्हणजे राजमाची. किल्ल्याचा भौगोलिक दृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येईल की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर किल्ले, तर दुसर्‍या बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिध्दगड, चंदेरी असा सर्व परिसर नजरेत पडतो. राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणं आहे यालाच ‘कोंडाणे लेणी’ असे म्हणतात.  ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसया शतकात म्हणजे सातवाहनकालाच्या सुरवातीला खोदलेली आहेत.अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ठ नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मीती राजमाचीवर असणार्‍या सत्तेखाली झाली. राजमाची किल्ल्यास पूर्वी ‘कोंकणचा दरवाजा’संबोधण्यात येत असे.

कल्याणच्या १६५७ च्या स्वारी नंतर त्याचवर्षी शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची ,लोहगड, तुंग, तिकोना, विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले. यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचा सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पुढे संभाजी महाराज जिवंत असे पर्यंत म्हणजेच सन १६८९ पर्यंत हे सर्व किल्ले मराठयांच्या ताब्यात होते.उल्हास नदीच्या या पात्रात कोंदीवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठ्या दगडात २१ हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थनिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन १९९३ पृष्ठ क्रं ७२१ वर दिला आहे. या परिसरात याला ‘जिजाऊ कुंड ’म्हणतात या कुंडात लोक मोठ्या श्रध्देने स्नान करतात.

पहाण्याची ठिकाणे:

१)उदयसागर तलाव
२)मनरंजन बालेकिल्ला
३)श्रीवर्धन बालेकिल्ला
४)शंकराचे मंदिर

This slideshow requires JavaScript.

धन्यवाद, 

मिहीर मपारा