हरिश्चंद्रगड

हरिश्चंद्रगड श्रेणी : मध्यम

किल्ल्याची ऊंची : 4000

Malshej Ghat

माळशेज घाट

नमस्कार मित्रहो,

तुम्ही “रायगड”, “राजगड”, “राजमाची” ह्या तीन गडांबद्दल माझ्या ब्लोगवर वाचले असेलच, असो अत्ता मी तुम्हाला आमच्या हरिश्चंद्रगड ट्रेक बद्दल सांगतो.तर झालं असं की आम्ही बरेच ट्रेक केले होते, पण जितके ट्रेक केले त्यात असा काही thrilling केलं न्हावतं, आम्हाला कुठेतरी मनात वाटत होतं थोडा Hard ट्रेक करावा यार, मग लगेच हरिश्चंद्रगड हे नाव माझ्या ध्यानात आलं, मी सगळ्यांना विचारला हरिश्चंद्रगड ??…सगळे जण म्हणजेच “मी”, “चैतन्य शिंत्रे” , “सौरभ रसाळ”, “राहुल डुंबरे“, “क्रिष्णा भाटीया”, “निनाद पै”, आणि नवखा “हार्दिक सोणी” तयार झालो. बरंका मित्रहो आम्ही भर पावसाळी ऋतूमध्ये ट्रेक ला निघालो होतो, हा आमचा पहिलाच २ दिवसांचा ट्रेक होता. हरिश्चंद्रगडावर जाण्यास “७” डोंगर पार करावे लागतात, साजीकच आहे ह्यासाठी तुम्हाला २ दिवस हवे आहेत. दिवस ठरला २२ जून २०११, नेहमी प्रमाणे एक दिवसाचा ट्रेक न्हवता, म्हणून मी आधी पासूनच सगळ्यांना काय-काय वस्तू घ्याव्यात सांगून ठेवले होते. सर्व प्रथम लक्षातघ्या तुम्ही कधीही २ दिवसाच्या ट्रेकला जाणार असाल तर नेहमी प्रत्येक व्यक्तीकडे एक torch  आणि माचीसची पेटी असावी, अजून २ दिवस तुम्हाला तुमची भूक भागवता येईल इतकं खाणं स्वतः जवळ ठेवा आणि म्हत्वाचे म्हणजे “पाणी” तुम्ही जिथे-कुठे जाणार आहात तेथे पाण्याची सोय आहे का ह्याची विचारपूस करून घ्यावी, नाहीतर प्रत्येकाने २ दिवस पुरेल इतके पाणी आपल्या जवळ ठेवावे. अजून एक म्हत्वाचे म्हणजे तुम्ही ट्रेकला जाताना तुमच्या बरोबर Refrigerator नाही घेऊन जाणार तर, जे पधार्थ २ दिवस राहू शकतील असेच घेऊनजावे उदा.ठेपले, bread-butter , पोळी , jam , लक्ष्यातघ्या जास्त तिखट पधार्थ घेऊन जाऊ नका, कारण तुम्ही जास्त तिखट खाल तर जास्त पाणी पिणार आणि पाण्याचे वजन भरपूर असतं, त्यामुळे तुमच्या पाठीवरचा भार कमीतकमी ठेवा जेणेकरून तुम्हाला ट्रेक करताना जास्त ओझे नाही होणार. असो ही सगळी पूर्व तयारी झाली, नेहमी प्रमाणे सकाळी आम्ही भेटलो, सुमारे ७.३० च्या आस-पास सगळे डोंबिवलीला जमले. गणपती बाप्पाचे नाव घेतले आणि आमच्या वारीला सुरवात केली. हरिश्चंद्रगड हा प्रचंड मोठा गड आहे. ठाणे, पुणे आणि नगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभा असणारा अव्हाढव्य पर्वत म्हणजे हरिश्चंद्रगड होय. पावसाचे दिवस होते, निसर्ग जणू उमलून उठला होता. सगळीकडे हिरवळ, धबधबेरानटी फुले, जणू निसर्गाने विवध रंगांची चादर ओढली आहे असे भासत होते.

गाडीत गप्पा-गोष्टी चालू होत्या, कोणी काय-काय आणलं आहे, कोणा कडे किती पाणी आहे अशी ट्रेकची पूर्व-तयारी आम्ही नेहमी गाडीत करतो. असंच करता-करता “माळशेज घाट” सुरु झाला. सगळे बोलता-बोलता शांत झाले आणि निसर्गाच्या सौंदर्याकडे बघून अचंबित झाले,तुम्हाला सांगतो सकाळी घाट इतका सुंदर दिसतो की तो अवर्णनीय आहे, शब्दच नाहीत त्याला. तुम्ही जेव्हा कधी हे दृश्य बघाल तेव्हा माझे बोलणे तुम्हाला नक्की पटेल. इतकं सुंदर निसर्ग होता की आम्ही आमची गाडी माळशेज घाटात चहापानासाठी थांबवली.

Malshej Ghat

माळशेज घाट

पाऊस,त्यातून सकाळ आणि त्यात पण माळशेज घाट इतकं सगळं जुळून येण्यासाठी भाग्यच लागते, आणि हो विसरलोच हातात चहाचा ग्लास. नुस्त एकून तुमच्या डोळ्या समोर हे दृश्य उभा ठाकलं असेल, याचं काय आहे की हे सगळं अनुभवता यावे म्हणूनच आम्ही trekking ला जातो. रोज-रोज आपलं एकच routine बनलं अस्त, त्यातून तुम्हाला रोज तीच उर्जा, काम करण्याची इर्षा जर टिकवून ठेवायची असेल तर हम्कास आमच्या बरोबर trekking करा. अर्थात हे सगळ्यांना शक्य होईलच असे नाही, परंतु तुमच्या सारख्यानसाठीच तर आम्ही आमचे अनुभव तुमच्या समोर मांडतो आहोत. कसं आहे बघा आठवड्यात जर तुम्ही ७ दिवस अगदी सारखेच घालवलेत तर त्यात वेगळेपण असे काहीच नाही, पण जर तुम्ही ह्यात ७ पैकी किमान १ दिवस outing किंव्हा trekking ला दिलात तर तुम्हालाच त्याचे फायदे दिसून येतील.  असो तर चहा-पान करून आम्ही हरिश्चंद्रगडाच्या मार्गी निघालो.

आम्ही खिरेश्वर गावातून जाणाऱ्या वाटेने गडावर जाण्यास ठरावले होते, खुबी फाट्यावरून आत शिरल्यास एक धारण लागते सुमारे ५ kms लांबी आहे त्याची. गाडी जेव्हा ह्या धरणावरून जात होती तेव्हा आम्हाला आमच्या जोंधळे college च्या रस्त्याची आठवण झाली, अगदी तसाच रस्ता 😛

Road to fortखिरेश्वर गावात आम्ही पोहोचलो, तेथून आम्ही आमच्या ट्रेकला सुरवात केली. आता ट्रेक मध्ये पुढे कसं आणि काय-काय होणार ह्याची आम्हाला कल्पना देखील न्हवती . हळू हळू आम्ही गडा कडे कूच करत होतो. आम्ही अत्ता पर्यंत जितके ट्रेक केले त्यात आम्हाला गड दिसत होता, म्हणजे कुठे जातोय ते दिसत होतं पण इथे हरिश्चंद्रगड दिसायचं नावच घेत न्हवता. आम्ही आपलं चालतोय आणि अंदाज बांधत होतो हा असेल, नाही तो असेल नाही तो मागचा असेल, काही काळातच न्हावतं. प्रचंड पाऊस पडत होता, धुकं इतका पडलं होतं की समोरची व्यक्ती दिसतच न्हवती. असच चालता-चालता आम्ही एका ठिकाणी येऊन पोहोचलो असा rockpatch असेल ह्याची आम्हाला कल्पनाच न्हवती, आम्ही फक्त ऐकून होतो की मध्ये २-३ rockpatch आहेत.

Rockpatch बघून आमची अवस्था एखाद्या हताश झालेल्या माणसा सारखी झाली आहे असे तुम्हाला फोटोमध्ये बघून वाटेल. आम्ही क्षणभर विचार केला अता कसं जायचं??? मग काय आमच्यातली झीद्द आणि धाडस ह्यामुळे आम्ही तो patch पार केला. आम्ही तो patch पार केला खरा पण आमच्या मनात एकच प्रश्न होता, इथून उतरणार कसं?? तुम्हाला सांगतो तुम्ही कधी पण बघा चढणं comparatively उतरण्यापेक्षा थोडे सोप्पे असते. ह्याचं कारण असं की चढताना तुम्ही तुमचं वजन घेऊन चढता तर ह्यात बर्यापैकी तुम्हाला balance सांभाळता येतो पण हेच उतरताना तुमचं वजन तुम्हाला खाली ढकलत असतं आणि ह्यात जर तुम्ही एक पण चुकीचं पाउल टाकलत तर तुमचा तोल नक्की जातो,  हे आम्ही आमच्या अनुभवातना सांगतो आहे. असो मी सगळ्यांना बोललो उतरताना बघू काय करायचा ते, आधी आपण गडावर तर जाऊया. तो patch संपला आणि आम्ही अजून वरती चढू लागलो, तस-तसं पाउलवाट अरुंद होऊ लागली, अगदी आपले दोन्ही पाय जोडून उभे राहू शकाल इतकीच वाट होती. एका बाजूला अरुंद वाट आणि दुसर्या बाजूला खोल दरी.

rockpatch मधील प्रवास

भर पाऊसात आम्ही ट्रेक करत होतो, पाऊसामुळे सगळीकडे घसरण झाली होती. तुम्ही ह्या घसरणीमुळे किती तरी वेळा तुमच्या society मध्ये पडला असाल किंवा कोणाला पडताना बघीतलं असेल असो संग्याचा मुद्दा असा की आम्ही अश्याच घसरण रस्त्याने पूर्ण ट्रेक केला. शेवटचा rockpatch पार करताना तोफानी पाऊस सुरु झाला, समोरचं काही दिसतच न्हावतं. त्याक्षणी आम्ही सगळे होतो त्या ठिकाणी थांबलो कारण चालायला अगदी अरुंद वाट होती. हळू हळू ती पाऊसाची सर कमी झाली, पण नुकत्याच पडलेल्या पाऊसामुळे वाट संपूर्ण ओली आणि घसरती झाली होती. मी सौरभ आणि निनादला सांगितलं तुम्ही दोघे पहिले पुढे जा, वाट बघा मग आम्हाला कळवा. सौरभ आणि निनाद पुढे निघाले आणि वाट बघून आले, सौरभ बोलला हा इतकाच patch dangerous आहे, पुढे वाट चांगली आहे. थोडा धीर वाटला कारण आम्ही ज्या ठिकाणी उभे होतो ती इतकी छोटी वाट होती की आम्हाला एका line मध्ये उभा राहणं गरजेचे होते. हार्दिकचा हा प्रथमच ट्रेकचा अनुभव होता, म्हणून मी निनाद आणि सौरभला बोललो हार्दिक ला घेऊनजा आम्ही मागून येतो. कसं आहे तुम्ही एखाद्याला मागून support देऊ शकता कारण तुम्ही त्याला तोंड करून जात असता, हेच जर तुम्ही पुढून जात असाल तर तुम्ही पाठ करून जाता. तुम्ही पुढून पण support देऊ शकता.पण तुम्हाला तेथे उभे राहून त्याच्या कडे वळून support देता येईल, परंतु इथे वळता येईल इतकी वाट न्हवती. हळू हळू करत एकदम धीराने आम्ही तो rockpatch पार केला. वरती पोहोचलो, अजून गडावर नाही माध्येभागी होतो.  इथेच आम्ही आमच्या bags टाकल्या आणि फोटो काढणे सुरु केले, बरोबरच आहे इतका खतरनाक rockpatch पार केल्याचा आनंद तुम्हाला इथे येऊन पार केल्याशिवाय नाही कळणार. फोटो बघून तुम्हाला थोडी कल्पना येईलच.

VICTORY…

असं करत-करत ३-४ तास चालत आम्ही एका सपाट जागेवर पोहोचलो. तुम्हाला सांगतो आम्ही अक्षरशः ढगात चालत होतो. समोरचं काही दिसतच न्हावतं, जमीनीवर directions follow करत होतो. ज्यांनी कोणी त्या खुणा केल्या असतील त्यांना आमच्या group काढून सलाम. असो तर मी कुठे होतो, हा ढग!! Literally ढगात चालत होतो म्हणजे समोर चालणारी व्यातकी दिसत न्हवती. इतक्यात राहुल डुंबरेने dialogue मारला “माणूस दोनदा ढगात जातो, एकदा जेव्हा तो मरण पावतो आणि दुसर्यांदा जेव्हा तो फुल प्यायलेला असतो. आपण काही न करता ढगात चालत आहोत!!! ”  आम्ही सगळे हसू लागलो आणि डुंबरेला शाबासकी देऊ लागलो… kya baat kya baat 😛 😛 😛 असे हे छोटे छोटे क्षण वातावरून अगदी मस्तवाल करून टाकतं. असो जेथे आम्ही उभे होतो तेथे खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर मंदिर होते, ते अकराव्या शतकातील यादवकालीन मंदिर होते. परंतु ढग इतके होते की समोरचं काही दिसतच न्हावतं. आम्ही चालून चालून अतिशय दमलो होतो, साजीकच आहे ४-५ तास चालून माणूस दमणारच. अगदी २ seconds साठी जोरात वार्याची झुळूक आली आणि आमचा आनंद गगनास जाऊन भिडला. चक्कं ५ तासाच्या कठीण प्रवासानंतर आम्हाला गडावरील मंदिर दिसले. इतकं आनंद झाला होता की हा आनंद तुम्हाला दहावी मध्ये ९०% मिळाले तरी नाही मिळणार.

खिरेश्वराचे प्राचीन शिवमंदिर

अखेर गडावर आम्ही पोहोचलो होतो. सुमारे संध्याकाळच्या ५ च्या सुमारास आम्ही तेथे पोहोचलो. आम्हाला ज्ञत होते की खिरेश्वर मंदिरा जवळ काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत. आम्ही ती गुहा शोधली म्हणजे तशी ती दिसतच होती फक्त तेथे जाण्याचा रस्ता शोधला. गुहेमध्ये समान टाकलं आणि काही क्षण विश्रांती केली. हा समान टाकण्य अगोधार आम्ही गुहा साफ करून घेतली, कोणता प्राणी किंवा छोटे किडे आहेत का ह्याची खात्री करून घेतली. बरंका लक्ष्यातघ्या कधीपण गुहेमध्ये राहण्या आधी ती नेहमी साफ करून घ्यावी आणि त्यात कोणता रेंगणारा प्राणी, किडा नाही ह्याची खात्री करुन्घ्या. असो तर संध्याकाळ होऊ लागली होती त्यामुळे शेकोटी करणं गरजेचे होते. आम्ही लाकडं गोळा केली आणि शेकोटी पेटवली. इथे आम्ही इतकं मूर्खपणा केला की तुम्हाला देखील हसू येईल. मी सतत सांगत होतो आपण शेकोटी बाहेर पेटवूया, पण नाही. आम्ही ती आम्ह्च्या गुहे मध्ये पेटवली. थोडा वेळ बरं वाटलं पण हळू हळू संपूर्ण गुहा धुराने भरली, आमचे डोळे जळू लागले, सगळेजण खोकत बाहेर पडली. आम्ही बाहेर पडली खरे पण आमचे समान आतच राहिले, इतक्या धुरात आतमध्ये जाने अशक्य झाले होते. डोळे नुसते जळतच होते, थोडा वेळ आम्ही असाच बाहेर थांबलो पण धूर काही कमी होइना. शेवटी हार्दिक आणि सौरभ चेहेर्याला रुमाल बांधून गुहेत गेले. कसं-बसं करत २ bags आणल्या. हळू हळू आम्ही सगळा समान बाहेर आणलं. समान बाहेर आणला खरं पण इतक्या रात्री म्हणजे सुमारे ८ च्या आसपास दुसरी गुहा शोधायची होती, आमच्या torch पण ३-४ होत्या त्यामुळे सगळे एक साथजाणं भाग होतं. पण रस्ता कसा आहे काही कल्पना न्हवती, मग मी निर्णय केला, सौरभ आणि निनादला दुसरी गुहेचा रस्ता बघून येऊदे. मग सगळे एक एक करून आपण तेथे शिफ्ट होऊ. ते तेथे गेले असताना मी आमच्या शेकोटी केलेल्या गुहेत गेलो रुमाल बांधून हा, संपूर्ण गुहा check केली, आमची कोणती वस्तू, समान तर राहिला नाही आत. दुसर्या गुहेमध्ये आम्ही shift झालो. इथे पण आम्हाला शेकोटी करणं गरजेचे होते कारण पावसामुळ आमच्या अंगात थंडी भरली होती , पण ह्यावेळी आम्ही ती गुहेच्या बाहेर केली. अत्ता इतके क्ष्रम केल्यानंतर भूक लागते, आम्हाला पण प्रचंड भूक लागली होती. आम्ही जरा settle झालो त्या गुहेत आणि न्यहारीला सुरवात केली. एक एक घास इतका सुंदर लागत होतं जणू आम्हाला कोणी अमृत आणून दिलं आहे असे वाटत होते. न्यहारी झाली थोडा आराम केला आणि उद्या काय करावे त्याचे discussion करू लागलो. आमच्या बरोबर अजून एक group आला होतं त्यांनी गावातून एक guide आणला होता. हे आम्हाला गड चढतानाच माहित होते. आम्ही त्या guide काकांना भेटलो आणि गडाबद्दल विचारपूस केली, ते म्हणाले सकाळी ११-१२ पर्यंत धुकं-ढग असेच राहतील, त्यामुळे तुम्हाला तो पर्यंत काही बघता नाही येणार. कोकणकडाला पण जाता नाही येणार. आम्ही थोडे हताश झालो कारण इतकं चढून आम्ही कोकणकडा बघण्यासाठीच तर आलो होतो. ते म्हणाले १२ नंतर धुकं थोडा कमी होईल तेव्हा बघा कडा. पण १२ म्हणजे खूपच उशीर झाला असता. आम्ही विचार केला तसं पण काही बघता नाही येणार मग लवकर उतरण्यास घेऊ म्हणजे पाऊस आला तरी आपण वेळेत खाली पोहोचू. पण आमच्या मनात त्या rockpatch बद्दल भीती होती, चढताना चढलो होतो खरे पण उतर्णताना तिथून उतरणे म्हणजे “विषाची परीक्षा” घेण्य सारखा होतं. गडावर येण्यासाठी २-३ वाट होत्या हे आम्हाला माहित होते, पण आम्हाला त्यातली फक्त एकाच वाट माहित होती ती म्हणजे आम्ही जेथून आलो ती. तेथून जाने नाही असे ठरवलेच होते आम्ही. असे आम्ही त्या guide काकांना सगळा सांगितले. ते आम्हाला दुसर्या रस्त्याने खाली घेऊन जाण्यास तयार झाले. हे असं सगळा घडलं दिवस भरात. आम्ही थोडा वेळा discussion केले अजून आणि झोपी गेलो. इथे पण एक गम्मत घडली, हार्दिक प्रथमच आला होता त्याला वाटत होता रात्री साप त्याच्या कानात जाईल म्हणून त्याने कानाला रुमाल बांधला होता आणि तो तसाच झोपला. सगळेच झोपी गेले, हा झोपलो तरी मी, विराज ,सौरभ तसे जागे असतोच. जरा पण आवाज, हालचाल झाली की आमचं लागेच लक्ष जाते. असच इथे घडले मध्येरात्री एका प्राण्याचा आवाज येऊ लागला. पहिले कोणी उठले नाही ,मी torch मारून सगळी गुफा check केली. काहीच दिसलं नाही. परत थोड्या वेळाने अजून जोरात आवाज येऊ लागला, ह्या वेळी सगळे उठले. आम्ही torch घेऊन सगळी कडे तपासून बघितलं, जिथून आवाज येत होता त्या दिशेला गेलो. तेथे आम्ही आमच्या bags ठेवल्या होत्या, bags मधून आवाज येतो आहे ह्याची खात्री पटली. आम्ही आमच्या bags दुसरीकडे ठेवल्या आणि बघतो तर काय, तेथे काहीच न्हवते :p सगळेच आश्चर्य चकित झाले, आवाज तर इथून येत होता आणि इथे काहीच कसं नाही. असो बरं झोपण्याच्या आधी आम्ही निर्णय केला होता असा की सकाळी लवकर उठून जितकं गडावरील परिसर बघता येईल तो पटकन बघून परतीचा प्रवास सुरु करायचा. पण तुम्हाला सांगतो सकाळीतर कालच्या पेक्षा भयंकर धुकं होतं, रस्ता तर सोडा समोरची झाडं पण दिसत न्हवती. सकाळी लवकर उठून आम्ही थोडा नाश्ता केला आणि परतीचा प्रवास सुरु केला. काल रात्री ठरल्या प्रणमे ते guide काका आम्हाला टोलारखिंड ( वाघ्या) पर्यंत पोहोचवतो म्हणाले होते. तसंच आम्ही त्या काकांना घेऊन निघालो. पण निघताना आम्हाला फार वाईट वाटत होते, इतका खडतर प्रवास धैर्य दाखून जो आम्ही केला तो कोकण कडा बघण्यसाठी, पण त्याचे दर्शन आम्हाला काही घेता नाही आले. आम्ही चुकीच्या वेळी ट्रेक केला असा वाटत होते. कोकणकड्याचा एक किस्सा आहे, एक मुलगा कोकण कड्याच्या  चक्क प्रेमात पडला होता. त्याला ते इतकं आवडलं होतं की त्याने कोकण कड्यावरून खाली उडी मारली होती, सगळा फक्त प्रेमपोटी. कोकणकड्यावर तुम्ही उभे पण नाही राहू शकत इतकं वार्याचा जोर असतो. त्यात उभे राहून खाली वाकून बघणे तर दूरची गोष्ट आहे. त्या मुलाचे इतके धाडस झालेच कसे हे ऐकूनच आम्हाला त्या मुलाबद्दल आदर वाटला. प्रेमापोटी माणूस किती वेडा होऊ शकतो हे उदाहरण सांगून देते आपल्याला. असो तर आम्ही परतीच्या प्रवसाला निघालो होतो. काका बोलले होते २ तास जास्त लागतील. आम्ही बोललो काका ठीक आहे, फक्त आम्हाला त्या rockpatch ने घेऊन जाऊ नका. दुसरी कोणतीपण वाट असेल तेथून घेऊन चला. आम्ह चालत होतो, आणि अचानक ते काका रस्ता शोधू लागले. आम्ही सगळे थोडे घाबरलो आता ह्यांनाच रस्ता नाही काळात तर आम्ही खाली उतरणार कसे??? सगळ्यांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले. आम्ही काकांना suggest केलं आपण परत जाऊ तो दुसरा group आला आहे त्यांच्या बरोबर उद्या सकाळी खाली उतरू कारण त्यांच्या कडे ropes होते, त्यामुळे rockpatch आरामात पार करता आला असता. पण देवाच्या मनात काही वेगळाच चालू होतं, आम्हाला अजून एक गावकरी काका दिसले, ते नुकतेच वरती गडा कडे कूच करत होते. आम्ही त्यांना विचारलं त्यांनी आमच्या guide काकांना त्यांच्या local भाषेत वाट सांगितली, कोणतीतरी गणपतीची वाट आहे इतकाच त्यांचा बोलण्यातून कळलं. तसे आमचे काका आम्हाला घेऊन जाऊ लागले. नशीब आमचे त्या काकांच्या रुपात आम्हाला देवाने मदद केली म्हणावे हे वावगे ठरणार नाही. आता सगळ्यांचा देवावर विश्वास नसतो म्हणा पण मला सांगा, नेमकं त्याच दिवशी, त्याच वेळी आम्हाला ते गावकरी भेटणे आणि त्यांनी आम्हाला रस्ता सांगणे हे काय आहे सगळे?? इतकं कोणाचा luck नसतं की इतक्या सगळ्या घटना एकदम जुळून येतात. असो  ज्याने त्याने ठरवावे आपला किती विश्वास असावा. बरं ही गणपती मंदिरा काढून जाणारी वाट म्हणजे पूर्ण गडाला प्रदिक्षिणा घालून खालती घेऊन जाणारी होती. ही वाट पण काही सोप्पी न्हवती अतिशय कठीणच होती. तुम्हाला सांगतो आम्ही ह्या वाटेवरून उतरताना चक्क आमचं पार्श्वभाग टेकवून उतरत होतो, पाऊसाने वाट पूर्ण घसरती झाली होती, त्यातून ह्या वाटेने लोकं जास्त येत नसत त्यामुळे घसरण अजूनच जास्त होती. एका ठिकाणी तर चक्क almost 70 – 80 degree मध्ये उतरत्या पायऱ्या होत्या. इथे तर आम्ही अगदी गोगलगाय च्या गतीने खाली उतरलो. असे करत करत आम्ही जंगलात पोहोचलो. त्या काकांना परत रस्ता कळेना. त्यांनी सगळी कडे नझर फिरवली, आणि आम्हाला म्हटले आपल्याला तेथे जायचा आहे. आम्ही कुठे जायचे आहे बघून वाट कडत गेलो, पायवाट न्हवती आम्ही आमचीच वाट करून जात होतो. Discovery च्या MAN vs WILD show   मधील Bear Grylls ची आठवण झाली आम्हाला 😛 असो असे करत करत काकांना वाट कळली आणि आम्ही टोलरखिंडीत (वाघ्या) पोहोचलो. इतकं आनंद झाला होता आम्हाला, तो आनंद मी तुम्हाला व्यक्त नाही करू शकत. एक एक क्षण जो आम्ही ट्रेक करताना घालवला त्याचे सगळे दृश्य मला माज्या डोळ्या समोर उभे राहिलेले दिसत होते. आम्ही त्या काकांना नमस्कार केला, धन्यवाद मानले आणि थोडे पैसे contri करून त्यांना दिले. तुम्हाला सांगतो मी चालता-चालता त्या काकांना त्यांचे वय विचारले होते ते ऐकून मी चकित झालो होतो, ६०+ वय होते त्यांचे आणि त्यांच्या चेहऱ्यावर जरा पण थकवा दिसत न्हवता. ते आम्हाला सोडून लगेच परत गडावर निघाले, कारण त्यांना त्या दुसर्या group ला घेऊन परत खाली यायचे होते. फक्त आम्ही त्यांना विनंती केली म्हणून ते आम्हाला वाघ्या पर्यंत सोडायला आले, खरंच अशी दिलदार माणसे फक्त गावातच आहेत. हेच तुम्ही शहरात, एखाद्याला कुठे सोडून येत का विचारलं तर तो नुसते हातवारे करून तुम्हाला रस्ता दाखवेल, किवा चुकीचा रस्ता पण दाखवेल. पण गावातील माणसं तशी नाहीत, काही झाले तर अक्खे गाव धावून येते. असो थोडा वेळ आम्ही त्या ठिकाणी आराम केला आणि परतीचा प्रवास तसाच सुरु ठेवला. आता इथून आम्हाला खाली उतरणे माहित होते, एकही rockpatch ह्यापुढे नाही हे आम्हाला अवगत होते. सव्वा दोन तासाने आम्ही पायथ्याशी पोहोचलो. गावात आल्यावर आम्ही इतके खुश झालो होतो की आम्ही इतका खडतर ट्रेक करून आलो ह्याचं आम्हाला थोडा आश्चर्य वाटत होते 😛 😛 😛 खाली आलो आणि आमच्या गाडीने आम्ही निघालो घराकडे. गाडीत बसल्यावर आम्ही काही खाण्याचे उरले आहे का बघितले. इतकी भूक लागली होती की, काही पण असेल ते खाण्याची तयारी होती, तर आमच्याकडे  फक्त bread – butter उरले होते. सगळ्यांनी त्याच्या वर ताव मारला आणि काही क्षणात ते संपवून टाकले. हरिश्चंद्रगडा बद्दल आठवणी घेऊन आम्ही घराच्या दिशेने जाऊ लागलो. तर मित्रहो अशी ही आमची हरिश्चंद्रगडाची सफर…

गड फत्ते करून परतलो…

चला जरा गडाबद्दल जाणून घेऊया…

या गडाचा इतिहास कुतूहलजनक तर भूगोल हा विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना मोगल अथवा मराठे यांच्या इतिहासाची पाश्वर्भूमी आहे, तर हरिश्चंद्रगडाला दोन चार हजार वर्षापूर्वीची पौराणिक पाश्वर्भूमी लाभली आहे. साडेतीन हजार वर्षांहूनही प्राचीन असलेल्या चहुबाजूंनी तुटलेल्या रौद्रभीषण कडेकपारींनी नैसर्गिक संरक्षण लाभलेल्या या हरिश्चंद्रगडाचा उल्लेख प्राचीन अग्नीपुराणात व मत्स्यपुराणात आढळतो. १७४७-४८ मध्ये हा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.गडाचे सर्वोच्च शिखर तारामतीवरून नाणेघाट, जीवधन, रतनगड, कात्राबाइची खिंड , आजोबाचा डोंगर, कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, भैरवगड, हडसर आणि चावंड हा परिसर दिसतो. मराठांनी हा गड १७४७ – ४८ मध्ये हा किल्ला मोगलांकडून घेतला आणि किल्लेदार म्हणून कृष्णाजी शिंदे यांची नियुक्ती केली.

पहाण्याची ठिकाणे : 

  1. हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
  2. केदारेश्वराची गुहा
  3. तारामती शिखर 
  4. कोकणकडा 

This slideshow requires JavaScript.

धन्यवाद,
मिहीर मपारा