स्वराज्याची पहिली राजधानी : “राजगड “

राजगड किल्ला श्रेणी(difficulty) : मध्यम

किल्ल्याची ऊंची :1394

||जय भवानी जय शिवाजी||

राजगडावर जायचा म्हणजे २ दिवस हवेत.आम्ही एकदा थंडीमध्ये प्लान केला कि राजगड मोहीम फत्ते करूया, पण काही कारणाने तो प्लान फ्लोप गेला. प्लान केला तेव्हा ७-८ तयार होती येण्यासाठी पण जायच्या २ दिवस आधी फक्त ४ जन तयार होती मग काय केला रद्द. त्यानंतर जवळ जवळ ४-५ महिन्याने परत राजगडाची मोहीम झाली… आणि ह्यावेळी सगळी तयार.गाडी ठरवली आणि आमची वारी निघाली “गडांच्या राजाला” म्हणजे राजगडला हो !!

उन्हाळ्याचे दिवस आणि trekking!! उन्हाळ्याच्या दिवसात जाम हालत होते.राजगड इतका उंच आणि पसरला आहे की तुम्ही तो एका दिवसात अजीबात पूर्ण बघू शकत नाही.इतक्या वरती चढून येणे आणि राजगड पूर्णपणे न बघणे म्हणजे मूर्खपणाच होय.सुमारे ११.३० वाजता आम्ही “गुंजवणे” गावात पोहोचलो, पटापट न्याहारी केली आणि सुमारे १२.३० वाजता लखलखत्या उनात आम्ही आमची गीरीयारोहणला सुरवात केली.हळू हळू आमची गडावर चडत होतो आणि सूर्य आमची जणू काही परीक्षाच घेत होता, पण काही झाला तरी आम्ही ENGINEERS आहोत, शेवटच्या क्षणापर्यंत झ्हुंज देतराहणा आम्हाला अगदी नेहमीचं.आमच्या कडचं पाणी हळू हळू संपत आला होता… मनात विचार आला आता वरती गडावर गेलो आणि तळ्यातला पाणी पिण्याच्या लायकीचे नसले तर काय होईल??? उद्याचा पूर्ण दिवस पाण्याशिवाय म्हणजे हलतच होणार!!२ दिवसा साठी पाणी घेऊन गेलो होतो खरा पण गड चढतानाच आमचे पाणी संपले. असं करत करत आम्ही संध्याकाळच्या ४-४.३० ला पोहोचलो. आजूबाजूला नझर टाकली आणि आम्हाला पाण्यचे तळ दिसले. इतका आनंद झाला की काही काळातच न्हवते, एकदम काही क्षणात आम्ही त्या तळ्याकडे पोहोचलो आणि ते पाणी मी आधी निरखून बघीतला तेव्हा मला इतका बरं वाटला कारण आम्ही ते पाणी पिऊ शकणार होतो.त्या पाण्याने आम्ही हात-पाय धुतले… प्रचंड थंड पाणी होते, आम्हाला नवलच वाटले वरती सूर्या इतकी आग ओततो आहे आणि तरी हे पाणी इतका थंड कसा!! तुम्हाला सांगतो हात-पाय धुतल्या नंतर आम्हाला अंगात थंडी भरली इतका थंड पाणी होतं.आसपासचा परिसर बघीतला आणि राहण्याची सोय केली. सरकार ने तसं एक झोपडं बांधला आहे २०-३० लोक राहू शकतील इतकी जागा आहे.

चला जरा राजगडाबद्दल जाणून घेऊया :

राजगड हे शिवाजीमहाराजांची पहिली राजधानी .बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे.नीरा वेळवंडीका नदी आणि गुंजवणी नद्यांच्या खोर्‍यांच्या बे्चक्यात मुरुंबदेवाचा डोंगर उभा आहे. मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती, म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व बालेकिल्ला आहे. बालेकिल्ला सर्वात उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे.

महेमद हाशिम खालीखान याने ‘मुन्तखबुललुबाबएमहेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो,‘राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु ? काय त्या किल्ल्याची उंची, काय त्यांचा विस्तार !जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. इतिहासातून येणार्‍या उल्लेखांवरुन सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वी पासूनचा हा डोंगर आहे. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रम्हर्षी ऋषींच्या नावावरुन येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरुन डोंगर फार पुरातन आहे.राजगडाचे पूर्वीचे नाव होते “मुरंबदेव”. हा किल्ला बहामनी राजवटी मध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते.  इ.स.१४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळकोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरूंबदेव हा किल्ला हस्तगत केला. मुरूंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाहीत. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरूमदेव किल्ला निजामशाही कडून आदिलशही कडे आला. निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिलीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहात होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबरावाने मुरुमदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखामाकडे दिला. इ.स. १६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला.सन १६४६ ते १६४७ च्या सुमारास शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबत हा किल्ला जिंकून घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठ्या झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या, त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. इ.स.१६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती. ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उध्वस्त केली. परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहीस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले.सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवरायांच्या प्रदेशावर स्वारी केली दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले. ३० एप्रिल १६६५ रोजी मुगल सैन्याने राजगडावर चाल केली, परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरुन विलक्षण मारा केल्या मुळे मुगलांना माघार घ्यावी लागली.शिवाजी महाराजांनी जयसिंग बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वत:कडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. शिवाजी महाराज आग्र्‍याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरुप पोहोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरुनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१- १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड स्थान राजधानी साठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरुन रायगडाकडे हलविली.

३ एप्रिल १६८० रोजी शिवरायांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडून ठार मारण्यात आले. यानंतर मुगलानी मराठ्यांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. ११ नोहेंबर १७०३ मध्ये स्वत: औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला. औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता. औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले, पण रस्ता काही नीट झाला नव्हता. त्यामुळे बरेचसे सामान आहे तिथे टाकून द्यावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडा जवळ पोहोचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच, त्याच उंचीचे दमदमे तयार करुन त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडीमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड‘ असे ठेवले.२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवा बरोबर राजगडावर स्वारी करुन तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. पुढे शाहुच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहुने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली.

पहाण्याची ठिकाणे:

१)रामेश्वराचे मंदिर
२)राजवाडा
३)पाली दरवाजा 
४)गुंजवणे दरवाजा
५)पद्मावती माची 
६)पद्मावती मंदिर 
७)संजीवनी माची
८)सुवेळा माची
९)बालेकिल्ला
१०)पद्मावती तलाव

आत्ता पुढे ऐका..

तर असा आहे राजगड!! आपण कुठे होतो… हा राहण्याची सोय… बरं ती झाली आणि मग आम्ही निवांत रात्रीच्या न्याहारी केली.तुम्हाला सांगतो दिवसभर इतकं भाटकल्याने आम्हाला सगळं जेवण मस्तच लागत होता, साधं Parle-G biscuit इतकं सुंदर लागत होतं.

अत्ता सर्वात मज्जेच काम… “शेकोटी” माणसाला शेकोटी लावायाला इतकी मज्जा का येते ईश्वरासच माहित.आजुबाजूचा परिसर फिरून लाकडं गोळा केली, लाकडं कसली जवळ जवळ एक पडलेलं झाडच उचलून आणला आम्ही :Pरात्र भर आमची शेकोटी पेटत राहिली. जशी रात्र होऊ लागली तसं आभाळ चांदण्याने भरू लागलं.

 लोकं आपल्या घरात RADIUM चे stickers घरात लावून कृत्रिम चांदणं तयार करतात, पण खर्या चांदण्याची सर खोट्याला कुठे…
रात्रभर लोकं गडावर येत होती…”शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी” अश्या घोषणा करत लोकं येत होती…असं करत करत सकाळ झाली.सकाळी जेव्हा आम्ही उठलो तेव्हा इतकी थंडी वाजत होती की शाल घेऊन पण थंडी जात नव्हती पण आम्ही रात्रीच शेकोटी केली होती. त्याचे निखारे सकाळ पर्यंत जळतच होते, पुन्हा थोडी लाकडं टाकली आणि अंगातील हुडहुडी कमी केली आणि आम्ही पूर्ण नव्या जोशाने गडावरची भ्रमंती सुरु केली.संपूर्ण गड बघून आम्ही परतीचा प्रवास सुरु केला… इतकं भव्य गड परिसर बघीतला तेव्हा विचार आलं, राजे इतक्या मोठ्या वस्तूवर लक्ष कसे ठेवत असतील.
आम्ही जेव्हा परत घरी येत असतो तेव्हा मनात कुणकुण होत असते, अत्ता पुन्हा तेच ROUTINE जीवन…
म्हणूनच महिन्यातून एकदा तरी आम्ही असे TREKKING करतो.
तुम्हाला वाटल्यास आमच्या बरोबर शामिल होऊ शकता…

This slideshow requires JavaScript.

अजून फोटोससाठी खलील लिंक बघा
धन्यवाद,

मिहीर मपारा